ऑस्ट्रिया : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी घरातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना आता घरची चाहूल लागलीय. या दोघींनीही घरी परतण्याची इच्छा व्यक्त केलीय. या दोन्ही अल्पवयीन मुलीही सध्या गर्भवती आहेत.
‘इसिस’ या धर्मांधवादी दहशतवादी संघटनेच्या अनेक पोस्टरवर झळकलेल्या या मुली इसिसच्या ‘पोस्टर गर्ल’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. यामध्ये, १७ वर्षांची सामरा केसिनोविच आणि तिची १५ वर्षांची मैत्रिण सबीना या सेलिमोविच या दोघींचा समावेश आहे. या दोघींचंही लहानपण ऑस्ट्रियाच्या व्हियनामध्ये गेलंय. याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाला गेल्या होत्या.
‘इसिस’मध्ये दाखल झाल्यानंतर या मुलींनी अतिरेक्यांशी विवाह केल्याचं सांगितलं जातंय. परंतु, या दोघांनी नुकतंच आपल्या घरच्यांशी संपर्क केला आणि घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली.
पण, आपली मुलगी परत यायला तयार झालीय हे कळल्यावर आनंदीत झालेल्या तिच्या कुटुंबीयांच्या आशा थोड्याच वेळात मालवल्या... कारण, इतके दिवस दहशतवाद्यांसोबत राहिलेल्या आणि दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलेल्या या मुलींना ऑस्ट्रिया सरकारनं मायदेशात परत घेण्यास नकार दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.