स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यास बंदी, सहा लाखांपर्यंत दंड

स्वित्झर्लंड सरकारने महिलांना बुरखा घालण्यास बंदी घातलीये. दक्षिण स्वित्झर्लंडमधील टिचीनो भागात महिलांना बुरखा घालण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला बुरख्यामध्ये दिसली तर तिला साडेसहा लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. 

Updated: Nov 27, 2015, 11:54 AM IST
स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यास बंदी, सहा लाखांपर्यंत दंड title=

नवी दिल्ली/ बर्न : स्वित्झर्लंड सरकारने महिलांना बुरखा घालण्यास बंदी घातलीये. दक्षिण स्वित्झर्लंडमधील टिचीनो भागात महिलांना बुरखा घालण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला बुरख्यामध्ये दिसली तर तिला साडेसहा लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. 

जनमत चाचण्यांनंतर सरकारने हे आदेश दिल्याची माहिती आहे. २०१३ मध्ये बुरखा घालण्याबाबत स्वित्झर्लंड सरकारने जनमत चाचणी घेतली होती. यामध्ये नागरिकांना त्यांची मते नोंदवण्यास सांगितली होती. तीनपैकी दोन व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याच्याविरोधात मते दिली. 

त्यानुसार दक्षिण स्वित्झर्लंडच्या टिचीनो भागात ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला साडेसहा लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. येथील संसदेने या कायद्याला मंजुरी दिलीय. यामुळे सार्वजनिक ठिकाणांसह दुकान, हॉटेल्स, पब्लिक बिल्डिंग आणि कारमध्ये बुरखा घालणे अपराध असेल. पर्यटकांनाही हा कायदा लागू करण्यात आला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.