बांग्लादेशने सर्जिकल स्ट्राईकचं केलं समर्थन आणि लष्कराचं कौतूक

पीओकेमध्ये जाऊन भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं बांग्लादेशने खुलेपणाने समर्थन केलं आहे. बांग्लादेशने म्हटलं आहे की, पाकिस्तानी सेनेच्या संरक्षणात असणाऱ्या दहशतवाद्यांपासून नागरिकांचं सक्षण करणं हे भारताचं कर्तव्य आहे. सर्जिकल ऑपरेशन दरम्यान भारतीय सैनिकांनी फक्त दहशतवाद्यांची ठिकाणंच नाही उद्धवस्त केली तर पुन्हा सुखरुप परत सुद्धा आले. त्याचं कौशल्य आणि संकल्पाचा हा परिचय आहे.

Updated: Sep 29, 2016, 06:46 PM IST
बांग्लादेशने सर्जिकल स्ट्राईकचं केलं समर्थन आणि लष्कराचं कौतूक

नवी दिल्ली : पीओकेमध्ये जाऊन भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं बांग्लादेशने खुलेपणाने समर्थन केलं आहे. बांग्लादेशने म्हटलं आहे की, पाकिस्तानी सेनेच्या संरक्षणात असणाऱ्या दहशतवाद्यांपासून नागरिकांचं सक्षण करणं हे भारताचं कर्तव्य आहे. सर्जिकल ऑपरेशन दरम्यान भारतीय सैनिकांनी फक्त दहशतवाद्यांची ठिकाणंच नाही उद्धवस्त केली तर पुन्हा सुखरुप परत सुद्धा आले. त्याचं कौशल्य आणि संकल्पाचा हा परिचय आहे.

काल रात्री लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे दहशतवादी तळ लष्कराने उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या यावेळी लष्करानं नियंत्रण रेषेपलिकडे दोन किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे सात तळ उधळून लावले. त्यासाठी हेलिकॉप्टरनं सैनिकांना पाकिस्तान नियंत्रित भागात उतरवण्यात आलं. या सैनिकांनी दहशतवादी तळांवर हल्ले चढवून पहाटे सहा वाजता ऑपरेशन यशस्वी केलं. त्यामुळे आता पाकिस्तान याविरुद्ध काहीतरी कारवाई करु शकतो त्यामुळे सगळ्यांना अलर्ट करण्यात आलं आहे.