इराकच्या ISIS दहशतवाद्यांवर अमेरिका करणार हल्ला

दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ला करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची घोषणा. इराकमध्ये जे काही घडते आहे त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करु शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं आहे.

Reuters | Updated: Aug 8, 2014, 10:13 AM IST
इराकच्या ISIS दहशतवाद्यांवर अमेरिका करणार हल्ला title=

वॉशिंग्टन: दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ला करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची घोषणा. इराकमध्ये जे काही घडते आहे त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करु शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं आहे.

इराक सरकारनं मदत मागितली असं अमेरिकेनं म्हटलंय. त्यामुळं इराकमधील युद्ध अधिक चिघळू शकते. दहशतवाद्यांच्या ताब्यातील भागावर हल्ला करण्याची परवानगी ओबामा यांनी सैन्याला दिली आहे. दहशतवाद्यांनी ताबा मिळवलेल्या भागात हवाई हल्ले करण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल, असं आश्वासन यावेळी ओबामांनी दिलं आहे. अमेरिकन नागरिकांना वाचवण्यासाठी ओबामांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ल्याची परवानगी दिली आहे.

आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी इरबिल शहरावर ताबा घेतल्यास कारवाई होणार, असं ओबामांनी म्हटलं आहे. इरबिलमध्ये अमेरिकेचं दूतावास आणि सैन्य सल्लागारांचं कार्यालय आहे. या दहशतवाद्यांनी गुरुवारी ख्रिश्चनबहुल काराकुष शहरावर ताबा मिळवला, त्यानंतर तिथून हजारो नागरिकांनी पळ काढला.

इराकचा बहुतेक भाग ISIS या दहशतवादी संघटनेनं ताब्यात घेतला आहे. कट्टरतावादी दहशतवाद्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून इराकमध्ये धुमाकूळ घातलाय. हिंसाचारात आत्तापर्यंत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. भारतीय नर्सेसना इराकमधून परत आणलं गेलंय. अजूनही काही भारतीय इराकमध्ये असू शकतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.