चमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला. 

Reuters | Updated: Oct 27, 2016, 03:24 PM IST
चमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले title=

टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला. 

नऊ महिने पूर्ण झाल्यावर लीनीने इतर बाळांप्रमाणे पुन्हा जन्म घेतला. लीनीच्या पूर्नजन्माचे संपूर्ण श्रेय जाते टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉक्टर डॅरेल कास यांच्या टीमला. लीनीची आई मार्गारेट गर्भवती असताना नियमित तपासणी करीत होती. त्यावेळी एका सोनोग्राफीमध्ये गर्भाच्या पाठिला टयुमर असल्याचे दिसले.

त्यावेळी मार्गारेट चार महिन्यांची गरोदर होती. लीनीला जो टयुमर होता तो कॉमन प्रकारात मोडणारा होता. पण टयुमरचा धोका होता. त्याच्या आकरमानामुळे लीनीचे ह्दय बंद पडण्याची शक्यता होती. त्यामुळे मृत्यूचा धोका जास्त होता.
 
त्यामुळे दोन पर्यात होते. एक म्हणजे गर्भपात किंवा गर्भातून बाळाला बाहेर काढून शस्त्रक्रिया करणे. मार्गारेटने दुसऱ्या पर्याय निवडला. त्यानुसार डॉक्टरांनी पाचव्या महिन्यात मार्गारेटच्या गर्भातून लीनलीला बाहेर काढून शस्त्रक्रियेव्दारे टयुमर काढून टाकला. त्यानंतर पुन्हा गर्भाला पुन्हा आईच्या गर्भात ठेवले. यासाठी पाच तास लागलेत.

 
पाचव्या महिन्यात लीनीला बाहेर काढले तेव्हा तिचे वजन ५३८ ग्रॅम होते. जन्माच्या वेळी लीनीचे वजन २.४ किलो होते. लीनलीची प्रकृती आता उत्तम आहे.