कैरो : इजिप्तमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४४ जणांचा मृत्यू झालाय. इजिप्तच्या दोन वेगवेगळ्या शहरात रविवारी हे स्फोट करण्यात आले. या स्फोटाची जबाबदारी आयसिस संघटनेनं स्विकारलीय. हे दोन्ही स्फोट चर्चमध्ये घडवण्यात आले.
पहिला स्फोट नान्ता शहराच्या सेंट जॉर्ज चर्चेमध्ये झाला. या स्फोटात किमान २७ जण मृत्यूमुखी पडले. तर दुसरा स्फोट अलेक्झांड्रिया शहरात झाला. सेंट पोप यांचं ऐतिहासिक स्थान असणा-या सेंट मार्क्स कॅथेड्रल या ठिकाणी हा स्फोट झाला.
यात १७ जण ठार तर ४० जण गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. पुढच्या आठवड्यात पोप फ्रान्सिस हे इजिप्तला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे स्फोट आयसिसनं घडवून आणलेत.