अमेरिकेत पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल, बॉबी जिंदाल रेसमध्ये

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या मुख्य लढतीपूर्वी प्रायमर म्हणजे पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल वाजू लागलेत. डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांचीच सरशी होईल, याची शक्यता असताना रिपब्लिकन पक्षात मात्र तब्बल १७ उमेदवार मैदानात आहेत.

Reuters | Updated: Aug 7, 2015, 05:42 PM IST
अमेरिकेत पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल, बॉबी जिंदाल रेसमध्ये title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या मुख्य लढतीपूर्वी प्रायमर म्हणजे पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल वाजू लागलेत. डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांचीच सरशी होईल, याची शक्यता असताना रिपब्लिकन पक्षात मात्र तब्बल १७ उमेदवार मैदानात आहेत.

या उमेदवारांच्या पहिल्या रिपब्लिकन प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ल्युझियाना प्रांताचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनीही आपली बाजू मांडली. अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणारे जिंदाल हे पहिले भारतीय वंशाचे नागरिक आहेत. आपण अमेरिकेला खरं नेतृत्व देऊ असा दावा त्यांनी यावेळी केला. अमेरिकेला केवळ बोलणाऱ्या नव्हे, तर काम करणाऱ्या अध्यक्षाची गरज असल्याचं जिंदाल म्हणाले. 

१७ जणांच्या या मेगा-रेसमध्ये जिंदाल सध्या तरी १३व्या स्थानावर आहेत. मात्र त्यांचे कालचं भाषण अनेक विश्लेषकांना आश्वासक वाटलंय. दुसरीकडे फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरही जिंदाल यांच्याच भाषणाची सर्वाधिक चर्चा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.