www.24taas.com, सांता मारिया
दक्षिण ब्राझिलमध्ये एका नाईटक्लबला लागलेल्या आगीत अडीचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत २४५ जणांचे मृतदेह हाती लागलेत आत्तापर्यंत ४८ जणांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलंय.
दक्षिण ब्राझिलमध्ये सांता मारिया शहरातल्या ‘किस क्लब’ नाईट क्लबमध्ये विश्वविद्यालयाचे जवळपास दोन हजार विद्यार्थी जमले होते. त्यावेळी अचानक लागलेल्या आगीनं पूर्ण क्लबला घेरलं. त्यामुळं शेकडो जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळं या क्लबला जणू स्मशानाचे स्वरुप आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
सुरुवातीला या आगीत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७० सांगितली जात होती पण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जसज सा या आगीवर ताबा मिळवला तसतसे त्यांना या क्लबच्या आत मृतदेह सापडले. घटनेदरम्यान, या क्लबमध्ये जवळ-जवळ ३००-४०० जण उपस्थित असल्याची माहिती मिळतेय. विश्वविद्यालयानं आपल्या विद्यार्थ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन या क्लबमध्ये केलं होतं. यामध्य रॉक बँड ‘पायरोटेक्निक’चा वापर करत होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर झालेल्या धावपळीत अनेकांनाचा चेंगरून आणि श्वास कोंडल्यामुळे मृत्यचू झाला.