ब्रिटीश महिलेचा विनयभंग, भारतीयाला तीन महिन्यांची शिक्षा

एका ब्रिटीश महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भारतीयाला तीन महिन्यांचा कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Updated: Dec 15, 2016, 11:58 PM IST
ब्रिटीश महिलेचा विनयभंग, भारतीयाला तीन महिन्यांची शिक्षा  title=

दुबई : एका ब्रिटीश महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भारतीयाला तीन महिन्यांचा कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

२३ वर्षांच्या मुलाने ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पती घरी आल्यानंतर तक्रार दाखल केली होती. ही व्यक्ती पाकिट घेऊन माझ्या घरी आली होती. घराच्या आवारात असताना त्याने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसात तक्रार करीन असे म्हणताच त्याने पळ काढला, असे तिने तक्रारीत म्हटले होते.

ब्रिटीश महिलेच्या तक्रारीवर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने भारतीयाला तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.