www.24taas.com, नवी दिल्ली
भातामुळे जाडेपणा येत असल्याचं, सुस्ती येत असल्याचं कारण पुढे करत अनेक लोक भात खाणं टाळत असतात. मात्र युरोपात भाताचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. आमटी-भात पदार्थ इंग्लंडमध्येही प्रसिद्ध आहे.
करी- भात या अस्सल भारतीय पदार्थाची लोकप्रियताही आता साता समुद्रापार पोहचलीय. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनाही करी-भाताने भूरळ घातली आहे. कॅमेरुन सध्या भारत दौ-यावर आहेत. `झी न्यूज`ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या करी-भात प्रेमाचे गुपीत उलगडले.संपूर्ण ब्रिटन या पदार्थाचा चाहता असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटीशांच्या या वेडामुळे आता हा पदार्थ भारतामधून आयातही होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.