...इथे मिळतं केवळ ७२ रुपयात घर!

महागाईचा सर्वात जास्त भार घर खरेदीवर पडतो. महागाईच्या काळात घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र एक असं ठिकाण आहे, जेथे घर इतकं स्वस्त मिळतं की तुम्हाला किंमत ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. 

Updated: May 17, 2015, 12:27 PM IST
...इथे मिळतं केवळ ७२ रुपयात घर! title=

नवी दिल्ली: महागाईचा सर्वात जास्त भार घर खरेदीवर पडतो. महागाईच्या काळात घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र एक असं ठिकाण आहे, जेथे घर इतकं स्वस्त मिळतं की तुम्हाला किंमत ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. 

या ठिकाणी तुम्ही घर फक्त ७२ रुपयांत म्हणजे १ युरोमध्ये खरेदी करु शकता. इटलीमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जेथे अशी स्वस्त घरं मिळतात. गांगी, सिसिली, केरेगा लिगर, पिडमॉन्ट आणि लेके नी मार्सी ही ती ठिकाणं आहेत. 

या ठिकाणी राहणारे लोक या ठिकाणांना अशुभ, अपशकुनी मानतात. त्यामुळे तेथील घरमालक आपली घरं विकत आहेत. लोकांचं माननं आहे की, येथे राहिल्यावर नोकरी मिळत नाही. 

त्यामुळे शहराच्या मेअरने ७२ रुपयात लोकांना घर दिलं जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र घर रिइनोव्हेट करण्यासाठी जवळपास १८ लाख खर्च येणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.