`स्कूबी-डू`मधल्या शॅगीचा आवाज कायमचा बंद झाला!

आपल्या शानदार आवाजासाठी जगभरात प्रसिद्ध झालेले रेडिओ होस्ट केसी कासेम यांचं रविवारी निधन झालंय. ते ८२ वर्षांचे होते...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 16, 2014, 05:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिग्टन
आपल्या शानदार आवाजासाठी जगभरात प्रसिद्ध झालेले रेडिओ होस्ट केसी कासेम यांचं रविवारी निधन झालंय. ते ८२ वर्षांचे होते...
‘फादर्स डे’चं सेलिब्रेशननंतर पहाटे ३ वाजून २३ मिनिटांनी वॉशिंग्टनच्या एका हॉस्पीटलमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला, असं कासेम यांच्या कुटुंबीयांनी म्हटलंय.
‘ते चांगल्या ठिकाणी गेले आहेत, अशी आम्हाला खात्री आहे. इथं त्यांना कोणतंही कष्ट होणार नाही... पण, आमचं हृदय मात्र त्यांनी तोडलंय’ असं त्यांची मुलगी केरी कासेम यांनी ट्विटर आणि फेसबुकवर म्हटलंय.

कासेम यांचा आवाज प्रसिद्ध टीव्ही कार्टुन शो ‘स्कूबी-डू’मध्येही वापरण्यात आलाय. या कार्यक्रमात त्यांनी ‘शॅगी’ नावाच्या कॅरेक्टरला आपला आवाज दिला होता.
तसंच अनेक जाहीरातींमध्येही कासेम यांनी आपला आवाज दिलाय. कासेम यांचा ‘अमेरिकन टॉप ४०’ हा प्रसिद्ध कार्यक्रम ४ जुलै १९७० रोजी लॉस एन्जेलिसमध्ये सुरु झाला होता. ‘...आणि आपले पाय जमीनीवर ठेवणं आणि आभाळातील ताऱ्यांपर्यंत पोहचणं विसरू नका’ या वाक्यावर त्यांच्या या कार्यक्रमाचा शेवट व्हायचा.
‘लोक शॅगी आणि स्कूबी-डू वर्षांनुवर्षांपर्यंत पाहतील. पण ते केसी कासेमला विसरून जातील. लोकांच्या विस्मृतीत गेलेला मीही एक व्यक्ती असेल...आणि मग कुणीतरी म्हणेन की हा तोच व्यक्ती आहे जो रेडिओवर ऐकू येत होता’ असं कासेम यांनी २००४ मध्ये न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना म्हटलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.