www.24taas.com, झी मीडिया, पारो
भुतान या देशाच्या दोन दिवसांच्या दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय.
भारतीय पंतप्रधानांच्या स्वागताला विमानतळावर भूतानचे पंतप्रधान शेरींग टोबगे उपस्थित होते. त्यानंतर मोदींना भुतानच्या लष्करी तुकडीने गार्ड ऑफ ऑनर दिला.
मोदींसोबत या दौ-यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आहेत. भुतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत.
भुतानी परंपरेनुसार मोदींचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर भुतानच्या रस्त्यांवर दुतर्फा भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भुतानच्या नागरिकांनी गर्दी केली होती. मोदींना भुतानचा ध्वज दाखवून त्यांचं स्वागत करण्यात येत होतं.
व्यापार आणि जलविद्यूत या दोन क्षेत्रांबाबत भारत आणि भुतान या दोन देशात चर्चा होणार आहे. या दोन दिवसांच्या दौ-यावर मोदी सुप्रीम कोर्टाचं उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
तसंच भुतान संसदेला ते संबोधीत करणार आहेत. त्याशिवाय पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रावर या भेटीत दोन्ही देशा दरम्यान चर्चा होईल.
भुतानशी चांगले संबंध प्रस्थापित करणे ही अपील प्राथमिकता असल्याचं मोदी म्हणालेत.
मोदींच्या या दौ-याला भारत चीन या संबंधांच्या अनुषंगानेही फार महत्त्व आहे.
भुतानशी संबंध दृढ करण्याची खेळी चीनने खेळली आहे. त्याला उत्तर म्हणून भारताच्या पंतप्रधानांनी आपला हा पहिला दौरा भुतानमध्ये आखला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.