चीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो"

चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  कारण, आता चीन दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे. 

Updated: Jul 25, 2015, 09:10 AM IST
चीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो" title=

बीजिंग : चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  कारण, आता चीन दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे. 

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन गेल्या अनेक वर्षांपासून "हम दो हमारा एक‘ अशा धोरणाचे पालन करीत आहे.

'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, चीन आता आपल्या 'एक मूल' धोरणात बदल करून जोडप्याला दुसरे मूल जन्मास घालू देण्याची परवानगी देऊ शकतो. सध्या चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे. १.२ अब्ज लोकसंख्येसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 

चीनच्या २९ प्रांत आणि नगरपालिकांमध्ये नोंद असलेल्या आई-वडिलांपैकी कोणत्या तरी एका कुटुंबात एकमेव मूल असेल, तर त्यांना दुसरे मूल जन्माला घालण्याची परवानगी दिली गेली आहे. ऑनलाइन सर्वेनुसार, चीनमधील लोक बहुमताने दुसऱ्या मुलाच्या धोरणाचे समर्थन करीत आहे. 

लोकसंख्येतील पहिले पाच देश

चीन : १४० कोटी 

भारत : १२८ कोटी 

अमेरिका : ३२ कोटी 

इंडोनेशिया : २५ कोटी 

ब्राझील : २० कोटी 

चीनमध्ये युवा जोडपी एकपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्यास तयार नाहीत, ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय आरोग्य तसेच कुटुंब नियोजन आयोगाच्या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी आलेल्या एका अज्ञात शोधकर्ताने 'चायना बिझनेस न्यूज‘ला सांगितले, की जर सर्व काही ठीक राहिल्यास दुसरे मूल जन्माला घालण्याच्या परवानगीशी संबंधित धोरण २०१५ च्या अखेरपर्यंत लागू केले जाऊ शकते'. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.