दाऊदला गमवावा लागणार पाय ?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला गँगरीन झालं आहे. त्यामुळे दाऊदला आपला पाय गमवावा लागू शकतो. 

Updated: Apr 25, 2016, 08:29 PM IST
दाऊदला गमवावा लागणार पाय ? title=

कराची: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला गँगरीन झालं आहे. त्यामुळे दाऊदला आपला पाय गमवावा लागू शकतो. 

दाऊदचा गँगरीन शेवटच्या स्टेजला पोहोचल्यामुळे आम्हाला त्याचा पाय कापण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नाही, अशी माहिती दाऊदवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दाऊदवर सध्या कराचीच्या लिकायत नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

1993 च्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचा दाऊद हा मास्टरमाईंड आहे. तेव्हापासूनच दाऊद भारताबाहेर पळून गेला आहे, आणि आता दाऊदला त्याचा पाय गमवावा लागला तर या अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्वाविषयीच प्रश्न उपस्थित राहू शकतात.