www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना करण्यात आलेली अटक आणि देण्यात आलेली अपमानास्पद वागणुकीबाबत अमेरिकेनं अखेर माफी मागितलीय.
अमेरिकेचे पराराष्ट्र मंत्री जॉन कैरी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेमन यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून देवयानी प्रकरणी झाल्या प्रकारबाबत खेद व्यक्त केलाय.
देवयानी खोब्रागडे यांची न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधीमंडळात बदली करण्यात आल्यानं देवयानी यांना राजकीय अधिकारी म्हणून संपूर्ण अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत.
भारताकडून या प्रकरणाबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्याचीच दखल घेत अमेरिकेनं स्वता:ची भूमिका स्पष्ट केलीये. मात्र या प्रकाराबद्दल अजूनही अमेरिकेनं भारताची माफी मागितली नाहीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.