www.24taas.com , झी मीडिया, कोलंबो
श्रीलंकन पारंपरिक विवाह पद्धतीचा लंकन पोलिसांनी अपमान केला, असं म्हणत श्रीलंकन सरकारनं कुत्र्यांच्या विवाहावर नाराजी व्यक्त केलीय. लंकेतल्या पोलिसांनी घेतलेल्या कुत्र्यांच्या जोपड्यांचं तिथल्या पारंपरिक पद्धतीनं विवाह लावून दिला होता.
श्रीलंकेच्या पोलिसांनी नुकतंच कुत्र्यांच्या नऊ जोडप्यांना घेतलं आणि या जोड्यांचा थाटात लग्नसोहळा साजरा केला. मात्र श्रीलंकेच्या सांस्कृतिक मंत्रालयानं यावर आक्षेप घेतला आणि कडक शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेच्या पोलिसांनी त्यांच्या बचावामध्ये असं म्हटले आहे, की “तपासकाऱ्यांमध्ये मदत करणाऱ्या श्वावनांचं प्रजनन वाढावं यासाठी हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता”. परंतु सांस्कृतिक मंत्रालयानं याप्रकरणी नाराजी व्यक्त केल्यानंतर आपल्या या कृत्याबद्दल पोलिसांनी माफी मागितली आहे.
श्रीलंकेचे सांस्कृतिक मंत्री टी.बी. एकनायके या प्रकरणावर म्हणाले," एका धर्मनिष्ठ बौद्ध देशातील पारंपारिक विवाहाची पोलिसांनी अवहेलना केली आहे. पारंपारिक सिंहली लग्नामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टेजचा वापर या विवाहसोहळ्यामध्ये करण्यात आला आहे. पारंपारिक विवाहसोहळ्यांचा पोलिसांनी अपमान केला आहे आणि मी याचा कडक शब्दांत निषेध करतो.` याआधी अशा प्रकारची घटना श्रीलंकेमध्ये घडली नसल्याचं सांगून पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.