जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा

जपानच्या उत्तर किनाऱ्यावर आज सकाळी शक्तीशाली भूकंप झाला. मात्र, या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, छोट्याप्रमाणात त्सुनामीचा तडाखा किनारी भागात बसल्याचे सांगण्यात येत आहे.

AP | Updated: Feb 17, 2015, 03:19 PM IST

टोकियो : जपानच्या उत्तर किनाऱ्यावर आज सकाळी शक्तीशाली भूकंप झाला. मात्र, या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, छोट्याप्रमाणात त्सुनामीचा तडाखा किनारी भागात बसल्याचे सांगण्यात येत आहे.

 सकाळी नऊच्या सुमारास जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्याला ६.९ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यानंतर समुद्रांतर्गत त्सुनामीची लाट उसळली होती. त्यामुळे उत्तरेकडील कुजी येथील किनाऱ्यावर ३.३ फूट उंचीच्या लाटा थडकल्यात. त्यामुळे कुजी किनाऱ्यावर नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यात आलाय. 

जपानच्या कुजी किनाऱ्याला २०११ मध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा फटका तडाखा बसला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.