काहीरा : इजिप्तमधील दक्षिण सिनाई भागातील शर्म अल शेख या रिसॉर्टजवळील महामार्गावर दोन पर्यटन प्रवासी बसची धडक लागून लागलेल्या आगीत 33 प्रवाशी जळून खाक झालेत. तर 41 प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
या दोन्ही बसमध्ये एकूण 80 प्रवासी होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे येथील आरोग्य मंत्रालयाचे सचिव मोहम्मद लशीन यांनी सांगितले. घटनास्थळी 30 अॅंब्युलंस पाठविण्यात आल्यात. दरम्यान, या अपघातातील सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
खराब रस्ता आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. एक अहवालानुसार 2013 वर्षामध्ये इजिप्तमध्ये 15,578 अपघात झाले व त्यामध्ये 6,716 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने मदत पोहोचविली गेली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.