26/11 हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेला, पाकिस्तानी माजी गुप्तचर प्रमुख

मुंबईवरील '26/11'चा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननंच केला हे कटू सत्य असून, ते कबूल करा आणि दोषींवर खटला चालवून शिक्षा करा, अशी पोलखोल खुद्द पाकच्याच गुप्तचर विभागाचे माजी महासंचालक तारीक खोसा यांनी केली आहे. या हल्ल्याचे तपास अधिकारी म्हणून काम केलेले खोसा यांनी पाकिस्तानची पोलखोल करत दहशतवादी कसाब हा पाकिस्तानी होता. लष्कर-ए-तोयबानं हल्ल्याचा कट रचला आणि कराचीतून हल्ल्या वेळी सूचना दिल्या, असंही जगजाहीर केलं आहे.

Updated: Aug 5, 2015, 09:30 AM IST
26/11 हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेला, पाकिस्तानी माजी गुप्तचर प्रमुख title=

इस्लामाबाद: मुंबईवरील '26/11'चा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननंच केला हे कटू सत्य असून, ते कबूल करा आणि दोषींवर खटला चालवून शिक्षा करा, अशी पोलखोल खुद्द पाकच्याच गुप्तचर विभागाचे माजी महासंचालक तारीक खोसा यांनी केली आहे. या हल्ल्याचे तपास अधिकारी म्हणून काम केलेले खोसा यांनी पाकिस्तानची पोलखोल करत दहशतवादी कसाब हा पाकिस्तानी होता. लष्कर-ए-तोयबानं हल्ल्याचा कट रचला आणि कराचीतून हल्ल्या वेळी सूचना दिल्या, असंही जगजाहीर केलं आहे.

मुंबईवरील '26/11'च्या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग होता हे अवघ्या जगाला माहीत आहे. भारतानं अनेक वेळा पाकला यासंदर्भात पुरावे दिले. परंतु पाकिस्तान सरकारनं वारंवार पुरावे नाहीत असा कांगावा केला. उलट कोर्टात खटला चालविण्याचं नाटक करून हल्ल्याचा मास्टर माईंड जकीरऊर रहेमान लख्वी याला तुरुंगातून मोकाट सोडलंय. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदवर तर काहीच कारवाई केली नाही. 

मात्र, पाकिस्तान सरकारनं नेमलेले तपास अधिकारी तारिक खोसा यांनीच पाकिस्तान सरकारचा बुरखा फाडला आहे. पाकमधील आघाडीचं वृत्तपत्र 'डॉन'ला खोसा यांनी लेख लिहून 26/11चा हल्ला पाकिस्ताननं केला होता हे कटु सत्य आहे हे सरकारनं कबूल करावं आणि दोषींवर कारवाई करावी, असं स्पष्टपणे म्हटलं आहे.

 

(with angency inputs)  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.