फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात ९ वर्षानंतर प्रथमच वाढ

अमेरिकची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं तब्बल ९ वर्षानंतर प्रथमच व्याजदरात पाव टक्क्याची वाढ घोषित केलीय.  या दरवाढीमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला आलेली सूज कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय येत्या काही महिन्यात व्याजाचे दर पुन्हा एकदा जैसे थे होतील असंही बोललं जातंय. 

Updated: Dec 17, 2015, 09:00 AM IST
 फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात ९ वर्षानंतर प्रथमच वाढ title=

वॉशिंग्टन : अमेरिकची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं तब्बल ९ वर्षानंतर प्रथमच व्याजदरात पाव टक्क्याची वाढ घोषित केलीय.  या दरवाढीमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला आलेली सूज कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय येत्या काही महिन्यात व्याजाचे दर पुन्हा एकदा जैसे थे होतील असंही बोललं जातंय. 

दरम्यान आता झालेल्या व्याजच्या दरवाढीचा आशियाई आणि विशेषतः भारतीय बाजारावर आज काय परिणाम होतोय, याकडे सर्वांचं लक्ष आहे. गेल्या दोन आठवड्यात शेअर बाजारानं सातत्यानं मोठी पडझड सोसलीय. 

पण अमेरिकन फेड रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या आदल्या दिवशी मात्र शेअर बाजार वधारला. त्यामुळे ही दरवाढ आधीच किमतीमध्ये सामावून घेण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र यामुळे रुपया आणि डॉलरचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे.  

सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयानं दोन वर्षातला नीचांकी स्तर गाठला. मंगळवारी आणि बुधवारी रुपया थोडा स्थिर असला तरी फेडच्या निर्णयानंतर हे समीकरण किती बदलतंय, याकडे भारतीय अर्थतज्ज्ञांचं लक्ष आहे.