प्राणी संग्रहालयातील महिला कर्मचाऱ्यावर वाघाचा हल्ला, महिला ठार

हॅमिल्टनच्या प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करून एका वाघाने तिला ठार मारल्याची घटना घडली. 

Updated: Sep 20, 2015, 04:45 PM IST
प्राणी संग्रहालयातील महिला कर्मचाऱ्यावर वाघाचा हल्ला, महिला ठार  title=

वेलिंग्टन : हॅमिल्टनच्या प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करून एका वाघाने तिला ठार मारल्याची घटना घडली. 

एका अपघातात प्राणी संग्रहालयातील महिला कर्मचाऱ्यावर वाघाने हल्ला केल्याचे न्यूझीलंडच्या पोलिसांनी सांगितले. 

न्यूझीलंडच्या राजधानी वेलिंग्टनपासून ५२० किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्राणी संग्रहालयात आज सकाळी हल्ला केला. महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.