फोर्ब्सच्या यादीत भारतातल्या आठ जणींचा समावेश...

अमेरिकेच्या फोर्ब्स मॅगझिनमध्ये यावेळी ५० महिला व्यावसायिकांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये भारतातल्या तब्बल आठ महिलांनी स्थान पटकावलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 3, 2013, 01:11 PM IST

www.24tass.com, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या फोर्ब्स मॅगझिनमध्ये यावेळी ५० महिला व्यावसायिकांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये भारतातल्या तब्बल आठ महिलांनी स्थान पटकावलंय.
मीडिया क्षेत्रातील शोभना भरतिया, हॉटेलिंग क्षेत्रातील प्रिया पॉल तसंच बँकींग क्षेत्रातील चंदा कोचर यांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. अमेरिका-चीनमधील मंदी तसंच युरोपातील चलन प्रश्नाच सामना करताना या महिलांनी आपली प्रतिभा पणाला लावली आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवलीय. प्रिया पॉल यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा संपूर्ण कारभार आपल्या हातात घेतला आणि तो नेटाने पुढे नेला. नव्या हॉटेल्सची शृंखलाच त्यांनी आपल्या जबाबदारीवर सुरू केली.
या यादित चीनच्या १६ महिलांनी स्थान मिळवलंय. हाँगकाँग आणि भारतातील प्रत्येकी आठ महिलांचा समावेश आहे. अमेरिका स्थित फोर्ब्स मॅगझिन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींचा समावेश यामध्ये करत असतं.

एक नजर टाकुयात या यादीत समावेश झालेल्या भारतीय महिलांच्या नावांवर
• शोभना भरतीया : अध्यक्ष, एडिटोरिअल डायरेक्टर, एचटी मीडिया
• चंदा कोचर : एमडी-सीईओ, आयसीआयसीआय बँक
• प्रिया पॉल : अध्यक्ष, अपीजय हॉटेल समूह
• किरण मुजुमदार-शॉ : संस्थापक आणि प्रबंध नर्देशक, बायोकॉन इंडिया
• चित्रा रामकृष्णा : संयुक्त निर्देशिका, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)
• रेणुका रामनाथ : संस्थापक, मल्टीपल्स अल्टरनेट एस्सेट मॅनेजमेंट इंडिया
• प्रिता रेड्डी : प्रबंध निर्देशक, अपोलो हॉस्पीटल
• शिखा शर्मा - मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रबंध निर्देशक, अॅक्सिस बँक