मालदीवचे माजी राष्ट्रपती भारताला शरण...

मालदीवचे पदच्यूत करण्यात आलेलेला माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना अटक करण्यासाठी कोर्टानं वारंट बजावण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 13, 2013, 04:36 PM IST

www.24taas.com, माले
मालदीवचे पदच्यूत करण्यात आलेलेला माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना अटक करण्यासाठी कोर्टानं वारंट बजावण्यात आलंय. यामुळे घाबरलेल्या नशीद यांनी राजधानी मालेस्थित भारतीय उच्च आयोगाला शरण आलेत. यानंतर दंगाविरोधी पोलिसांनी भारतीय आयोग भवनाला घेरलंय.
नशीद यांच्या अटकेच्या आदेश आल्यानंतर बुधवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास नसीद यांनी भारतीय उच्च आयोगाकडे शरणागती पत्करलीय. सूत्रांच्या माहितीनुसार नशीद हे उच्च आयोगाशी सल्ला-मसलत करत आहेत. परंतू, याच वेळेस मालदीप पोलिसांनी मात्र भारतीय उच्च योगाच्या भवनालाच घेराव घातलाय. १० फेब्रुवारी रोजी नशीद यांना कोर्टासमोर हजर व्हायचं होतं, पण ते यावेळी अनुपस्थितीत राहिले. त्यानंतर नशीद यांच्याविरुद्ध समन्स बजावले गेले.
या अगोदर नशीद यांनी कोर्टाकडून संमती घेऊन भारत दौराही केला होता. ९ फेब्रुवारी रोजी ते पुन्हा मालदीवमध्ये परतणार होते. परंतू, कोर्टाच्या आदेशांची अवहेलना करत नशीद दोन दिवस उशीरा म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी मालदीवमध्ये दाखल झाले होते.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोहम्मद नशीद यांच्याऐवजी मोहम्मद वाहिद यांनी मालदीवच्या राष्ट्रपतीपदाचा कारभार हातात घेतला. मालदीवमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रपती निवडणुका पार पडणार आहेत.