जोहन्सबर्ग : महात्मा गांधींच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. ४५ वर्षीय आशीष लता यांनी दक्षिण आफ्रिकेतील दोन व्यापा-यांना ८ लाख ३० हजार डॉलर्सना फसवल्याचा आरोप करण्यात आलाय.
भारतातील नेटकेअर रुग्णालयातर्फे एक कंत्राट मिळाल्याचा दावा करत त्यांनी स्थानिक व्यापा-यांकडून ही रक्कम घेतली होती. आशीष लता या सामाजिक कार्यकर्त्या इला गांधी यांच्या कन्या आहेत.
अशीष लता हिच्यावर दक्षिण आफ्रिकेत दोन व्यापाऱ्यांना जवळजवळ ८,३०,००० डॉलर्सना फसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी डर्बनमधील न्यायालयात ती हजर झाली होती. तिच्यावर चोरी, फसवणूक आणि धोका दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.