७०० किलोचा पतंग कोसळून चार जखमी

पतंगाचा मांजा लागून जखमी झाल्याचं आपण ऐकलं असेल, पण जपानमध्ये ७०० किलो वजनाचा पतंग कोसळून ४ जण जखमी झाले आहेत.

Updated: Jun 1, 2015, 10:41 PM IST
७०० किलोचा पतंग कोसळून चार जखमी title=

टोकिओ : पतंगाचा मांजा लागून जखमी झाल्याचं आपण ऐकलं असेल, पण जपानमध्ये ७०० किलो वजनाचा पतंग कोसळून ४ जण जखमी झाले आहेत.

जपानमध्ये ७०० किलो वजनाचा बांबूचा पतंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वृद्ध आणि लहान मुलाचा समावेश आहे.

हिगाशोमी भागात १३ बाय १२ मीटरचा पतंग असून हा पतंग 'तातामी' चटईपासून बनवण्यात आला आहे. २०० मीटर उंचीवर असताना पतंग अचानक पडू लागला. हा महाकाय पतंग बघ्यांवर कोसळला. 

स्थानिक हवामान खात्याने सांगितले की, हिगाशोमी भागात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी.  हिगाशोमी हा भाग पतंग महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या भागात कायम मोठमोठे पतंग उडवले जातात.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यात व्यावसायिक निष्काळजीपणा झाला असावा, असा संशय आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.