मुंबई : 'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही' असे कल्याण येथून इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी गेलेल्या फहाद शेखने आपल्या कुटूंबीयांना सांगितले आहे. चार भारतीय तरुणांपैकी एक असलेल्या फहाद शेख याने परत येण्यास नकार दिला आहे.
शेख याने दुरध्वनी केलेल्या क्रमांकावर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. मात्र शेख याने भारतात परतण्यास नकार दिला.
भारतामध्ये मुस्लिम समुदायास समाधानकारक वागणूक मिळत नसल्याने आपण परत येणार नसल्याचे, त्याने सांगितले. शेख याच्याबरोबरच सीरियामध्ये गेलेला अरीब माजीद हा तरुण गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतामध्ये परतला असून सध्या एनआयएच्या ताब्यात आहे.
स्काईपने संपर्कात
गेल्या वर्षी घर सोडलेल्या शेख याने सुमारे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा आपल्या कुटूंबीयांशी संपर्क प्रस्थापित केला. त्यानंतर शेख हा कुटूंबीय आणि मित्रांशी नियमतरित्या दुरध्वनी वा स्काईपच्या माध्यमामधून बोलत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहीम तांकी ठार
शेख याच्याबरोबरच इसिसकडून जिहाद करण्यासाठी गेलेला सहीम तांकी हा ठार झाला असल्याची माहिती त्याने दिली आहे. त्याने तांकी याचे छायाचित्रही त्याच्या कुटूंबीयांसाठी पाठविले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.