४५० किलो वजनच्या महिलेच्या अंगाखाली येऊन मुलाचा मृत्यू

एखादा महिलेचं वजन किती असू शकतं? १०० ते १२० किलो.. तुम्हांला विश्वास वाटणार नाही, मात्र मारिया रोजालेस महिलेचे वजन तब्बल ११०० पाऊंड अर्थातच जवळपास ४५० किलो इतके आहे.

Updated: Oct 12, 2012, 08:35 PM IST

www.24taas.com
एखादा महिलेचं वजन किती असू शकतं? १०० ते १२० किलो.. तुम्हांला विश्वास वाटणार नाही, मात्र मारिया रोजालेस महिलेचे वजन तब्बल ११०० पाऊंड अर्थातच जवळपास ४५० किलो इतके आहे.
आपल्या अगडबंब शरीरामुळे मारिया चर्चेचा विषय आहे. मात्र २००८ साली ती आणखी एका कारणाने चर्चेत आली होती. अमेरिकी मीडियाने मारियाची `हाफ टन किलर` असे म्हणून निंदा केल्याचे बोलले जाते.
मारियाने दोन वर्षीय मुलगा एलिसियो जूनिअरचा मृत्यू आपल्या शरीराखाली दबल्याने झाला होता असे म्हटले होते. एलिसियो मारियाची बहीण जेमीचा मुलगा होता. मात्र नंतर जेमीनेच मारहाण केल्यामुळे दोन वर्षीय एलिसियोचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.