अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी पुन्हा दाखल!

अमेरिकेच्या माजी परदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांनी रविवारी राष्ट्रपती पदासाठी दावा दाखल केलाय. 

Updated: Apr 13, 2015, 01:59 PM IST
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी पुन्हा दाखल! title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांनी रविवारी राष्ट्रपती पदासाठी दावा दाखल केलाय. 

एका व्हिडिओच्या माध्यमातून हिलरी यांनी नागरिकांशी संवाद साधलाय. 'मी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढतेय. अमेरिकन जनतेला प्रत्येक दिवशी एखाद्या सहाय्यकाची गरज भासते.. आणि तीच व्यक्ती मला बनायचंय.' असं हिलरी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय. हिलरी यांनी २०१६ च्या प्रचार अभियानाशी संबंधित या व्हिडिओत 'अमेरिका आपल्या कठिण आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडलीय. परंतु, अजूनही केवळ उच्चवर्गालाच आर्थिक लाभ मिळतोय' असंही म्हटलंय. 

यापूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी माजी परदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांचं तोंडभरून कौतुक केलंय. हिलरी या 'उत्कृष्ट राष्ट्राध्यक्ष' होऊ शकतात, असंही ओबामा यांनी म्हटलंय. 

हिलरी क्लिंटन या राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या आगमी निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून आपला अर्ज दाखल केलाय. 'अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष' होण्याचा मान हिलरी यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.  २००८ मध्ये जोरदार प्रचाराच्या जोरावर ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांना मागे टाकलं होतं. त्यानंतर, चार वर्षांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावार ओबामा यांचीच निवड झाली.

ओबामा यांच्या पहिल्या कार्यकाळात हिलरी यांनी परदेश मंत्री म्हणून काम पाहिलंय. ' २००८ मध्ये एक हिलरी माझ्यासाठी एक दमदार प्रतिस्पर्धी होत्या. निवडणुकांमध्ये त्यांनी मला पूर्ण समर्थन दिलं होतं. त्यांनी परदेश मंत्री म्हणूनही कारभार उत्तमप्रकारे सांभाळला. त्यांची आणि माझी खूप चांगली मैत्री आहे' असं म्हणत ओबामा यांनी हिलरींचं कौतुक केलंय. 

'मला वाटतं त्या खूप चांगल्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकतील' असं म्हणत ओबामा यांनी हिलरी यांच्यावर विश्वासही व्यक्त केलाय. 

अमेरिकन मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय हिलरी डेमोक्रोटिक पक्षाकडून आपला नामांकन अर्ज दाखल केलाय. 

बिल क्लिंटन यांच्या पत्नी म्हणू माजी 'प्रथम महिले'चा मान मिळवणाऱ्या हिलरी यंदा राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या उत्तराधिकारी बनून 'डेमोक्रेटिक फ्रंटरनर' असतील, अशी दाट शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार, जवळपास ६० टक्के लोकांनी आपली मतं हिलरी यांना देण्याची तयारी दाखवलीय. 
  
    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.