ढाका : बांग्लादेशमध्ये आज एक आगळी वेगळी घटना घडलीय. एक ट्रेन कोणत्याही ड्रायव्हर किंवा गार्डशिवाय मागच्या बाजुला चालत गेली...
जवळपास २६ किलोमीटरपर्यंत ही रेल्वे गाडी मागच्या बाजुस आणि तेही कोणत्याही नियंत्रणाशिवाय चालत गेली.
यावेळी, या रेल्वेत २३ प्रवासी प्रवास करत होते. राजबरहीचे स्टेशन मास्तर कमरुज्जमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजबरहीहून फरीदपूर जाणारी ही सहा डब्ब्यांची ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती आणि यात २३ प्रवासी होते. अचानक इंजन ऑटो गिअरमध्ये गेले आणि गाडी मागच्या दिशेने चालती झाली.
यावेळी, गाडीचा ड्रायव्हर चहा पिण्यासाठी खाली उतरला होता आणि त्यानं इंजिन सुरूच ठेवलं होतं. यावेळी गाडीमध्ये कोणताही गार्ड नव्हता...
हे लक्षात आल्यानंतर तिकीट कलेक्टर अन्वर हुसैन यांनी मोठ्या प्रयत्नानं दोन डब्ब्यांमधील व्हॅक्युम ब्रेकचा पाईप वेगळा केला आणि ट्रेन बाबू बाजार पूलजवळ थांबली.
त्यानंतर दुसऱ्या इंजिनच्या मदतीनं ही ट्रेन पुन्हा राजबरहीला आणली गेली. ट्रेनच्या ड्रायव्हर आणि गार्डला निलंबित करण्यात आलंय. घटनेच्या चौकशीसाठी एक पाच सदस्यीय समिती नेमली गेलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.