वँकूवर : कॅनडाच्या तीन दिवसांच्या यांत्रेतील शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी सकाळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी वँकूवर इथं दाखल झाले. इथं त्यांनी गुरुद्वारा खालसा दीवानमध्ये माथा टेकला तसचं लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा-अर्चनादेखील केली. यावेळी मोदींसोबत कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्परही होते. यादरम्यान उपस्थित लोकांनी मोदी-मोदीचे नारेही दिले.
लक्ष्मी नारायण मंदिरात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतियांना संबोधित करताना हिंदूवाद धर्म नसून ती एक जीवनशैली असल्याचं म्हटलंय. हिंदू धर्माच्या माध्यमातून मानवतेसाठी काम करण्याची गरज असल्याचंही यावेळी मोदींनी म्हटलंय. मोदी म्हणतात, भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं हिंदू धर्माची सुंदर व्याख्या केलीय. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, हिंदू धर्म हा काही धर्म नाही तर एक जीवनशैली आहे. उच्चतम न्यायालयाची ही व्याख्या सगळ्यांनाच रस्ता दाखवते, असंही मोदींनी म्हटलंय.
भारत योग गुरु आहे ज्याचा अविष्कार आपल्या ऋषी-मुनींनी केलाय. हे आपल्या स्वास्थ्यावर चांगला प्रभाव टाकतो, असं म्हणत नरेंद्र मोदींनी २१ जून हा संपूर्ण जगात योग दिवस म्हणून साजरा केला जाईल, असंही सांगितलंय. संयुक्त राष्ट्रानं मोदींच्या आग्रहावर १२५ दिवसांच्या आतच हा प्रस्ता पारीत केलाय तसंच यामध्ये १७७ देश सहभागी झालेत. कॅनडाही या देशांपैकी एक असल्यानं आपल्याला त्याचा आनंद होतोय, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.