लंडन: भारतीय वंशाचे बिझनेसमन एस.पी.हिंदुजांच्या हिंदुजा समूहानं स्पॅनिश औद्योगिक कंपनीसोबत मिळून ब्रिटनचं महत्त्वपूर्ण असलेलं ‘ओल्ड वार ऑफिस बिल्डिंग’चं अधिग्रहण केलंय. या बिल्डिंगमध्ये कधी काळी ब्रिटनचे युद्धकाळातील पंतप्रधान विन्सटन चर्चिल यांचं वास्तव्य होतं.
ही जुनी इमारत हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एस. पी. हिंदुजा, सह-अध्यक्ष जी. पी. हिंदुजा यांनी ओब्रास्कॉन हुआर्ते देसारोलोस (ओएचएलडी) सोबत मिळून विकत घेतलीय.
मध्य लंडनमध्ये असलेल्या महत्त्वाच्या इमारतीला आता नव्यानं विकसीत केलं जाणार आहे. नवी रंग-रंगोटी करून फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याचं रूपांतर केलं जाणार आहे. यात स्पा, फिटनेसची सुविधा असलेल्या खोल्या असतील.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं याची पुष्टी करतांना म्हटलंय, हिंदुजा समुहानं ओएचएलडीसोबत मिळून युद्धकालीन कार्यालय भवनचं अधिग्रहण केलंय. मंत्रालयानं सांगितलं की, ५,८०,००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या संपत्तीला २५० वर्षाच्या व्यवस्थेसह विकल्या जात आहे.
दरम्यान, करार किती रूपयांमध्ये झाला याची माहिती दिली नाही. मात्र करार लिलावानंतर झाला, असं त्यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.