सिडनी : ऑस्ट्रेलियन चित्रकार पीटर लिक यानं या आठवड्यात एक विश्व रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. लिकनं रेखाटलेलं एक चित्र तब्बल ६५ लाख डॉलर्सला (म्हणजेच जवळपास ४०,७१,९२,१७५ रुपये) विकलं गेलंय. इतकं महागडं ठरलेलं हे पहिलंच चित्र असून हा एक रेकॉर्डच आहे.
'फॅन्टम' या नावानं ओळखलं जाणारं हे चित्र 'ब्लॅक अॅंड व्हाइट' चित्र आहे. यामध्ये, प्रकाशाचा एक किरण अॅरिझोनच्या प्राकृतिक दृश्यातून जेव्हा जातो तेव्हा ते दृश्य अतिशय आकर्षक दिसतं... आणि हेच दृश्यं या चित्रकाराने आपल्या कुंचल्यांतून अतिशय उत्तमप्रकारे रेखाटलंय. लिकच्या या चित्रानं एक इतिहास प्रस्थापित केलाय, असं एका वेबसाईटवर म्हटलं गेलंय.
या चित्राची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही. लिक याने कमी वयातच त्याच्या मूळ घराजवळच्या नैसर्गिक आश्चर्यांची चित्र रेखाटण्यास सुरुवात केली होती. १९८४ मध्ये अमेरिकेत गेल्यानंतर त्याची ही कला आणखीनच बहरत गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.