www.24taas.com, वॉश्गिंटन
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॉलिवुडही सरसावलंय. बराक ओबामा आणि मिट रोम्नी या दोघांच्या बाजूनेही कलाकार किल्ला लढवताहेत. त्यामुळे निवडणुकीला चांगलंच ग्लॅमर आलंय. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हॉलिवुडही पुढं सरसावलंय.
बराक ओबामांसाठी तर मोठ्या संख्येनं कलाकार पुढे आलेत. यात बियॉन्से, ज्युलियन मोर यांच्यासह अनेक पॉप गायकांचा समावेश आहे. ओबामांच्या नेतृत्वाखालीच अमेरिकेचा उत्कर्ष होईल असं त्यांचं म्हणनं आहे. मिट रोम्नींच्यामागे ओबामांसारखा कलाकारांचा ताफा नाही. मात्र मॅडाना हिने ही कसर कमी केलीय. भारतातल्या पुनम पांडेप्रमाणे तिने घोषणा केलीय.
भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकल्यावर जे करण्याची घोषणा पुनमने केली होती तशीच घोषणा या मॅडोनाने केली आहे. त्यामुळे मॅडोना काय करते? याची उत्तसुकता नसली तरी अमेरिकेतल्या निकालाची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागून राहणार हे निश्चित.