VIDEO | जमीन श्वास घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेतील नोवा स्कॉटिया येथील जंगलाची जमीन श्वास घेत असल्याचा अत्यंत जबरदस्त व्हिडिओ सध्या ऑनलाइनवर धुमाकूळ घातलो आहे. या व्हिडिओला सुमारे ३० लाख लोकांनी पाहिला आहे. एका ढेरपोट्या माणून श्वास घेताना कसा दिसतो तशी ही जंगलाची जमीन श्वास घेतले आहे असा हा व्हिडिओ आहे. 

Updated: Nov 12, 2015, 07:32 PM IST

स्कॉटिया : अमेरिकेतील नोवा स्कॉटिया येथील जंगलाची जमीन श्वास घेत असल्याचा अत्यंत जबरदस्त व्हिडिओ सध्या ऑनलाइनवर धुमाकूळ घातलो आहे. या व्हिडिओला सुमारे ३० लाख लोकांनी पाहिला आहे. एका ढेरपोट्या माणून श्वास घेताना कसा दिसतो तशी ही जंगलाची जमीन श्वास घेतले आहे असा हा व्हिडिओ आहे. 

हा व्हिडिओ या ३० ऑक्टोबरला चित्रित करण्यात आला आहे. अॅपल नदी जवळ हा ब्राय न्यूटल यांनी हा चित्रित केला आहे. या भागातून जात असताना हा विचित्र प्रकार त्यांना दिसला. ते सुरूवातीला घाबरले पण नंतर त्यांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. 

या व्हिडिओमध्ये जंगलाची जमीन अत्यंत विचित्रपणे श्वास घेतल्यासारखी हालत आहे.  

जमीन हलण्याचं खरं कारण

काही तज्ञांच्यामते, जंगलातील झाडांची मूळांची हालचाल होत असल्यामुळे जंगलाची जमीन हालत असल्यासारखे दिसत आहे. जेव्हा जोराचा वारा येतो तेव्हा झाडं हालतात आणि त्यानंतर त्या झाडाची मूळही हालू लागतात त्यामुळे ही विचित्र हालचाल होताना दिसत आहे. त्यामुळे जमीन श्वास घेतले असते वाटते आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.