इस्लामाबाद : पाकिस्तानननं गायक अदनान सामी याला नागरिकत्वासंबंधी एक जोरदार झटका दिलाय.
पाकिस्तानी गायक अदनान सामी याला आपलं पाकिस्तानी नागरिकत्व संपुष्टात आणून भारताचं नागरिकत्व स्वीकारण्याची इच्छा आहे... तसा अर्जही त्यानं दाखल केलाय. परंतु, पाकिस्ताननं मात्र अदनान सामीचं नागरिकत्व संपुष्टात आणण्यासाठी नकार दिलाय.
अधिक वाचा - पाकिस्तानी गायक अदनान सामी 'भारतीय' होणार?
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय ओळख लक्षात घेत अदनानच्या कथित अनुचित व्यवहारावरून त्याचं नागरिकत्व संपुष्टात आणण्याचं प्रमाणपत्र देण्यास नकार दिलाय. आपल्या राष्ट्रीयतेशी संबंधीत कागदपत्र अदनाननं फेकून दित सामीनं आपल्या 'राष्ट्रीयत्वाचा' अपमान केला होता, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
अधिक वाचा - पाकिस्तानच्या या वादग्रस्त गायकाला भारतात राहण्याची परवानगी
हे प्रमाणपत्र अदनानसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पाकिस्तानचं नागरिकत्व संपुष्टात येईपर्यंत अदनानला भारताचं नागरिकत्व स्वीकारता येणार नाही, त्यामुळे त्याच्यासमोर आता मोठा पेच-प्रसंग उभा राहिलाय.
याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सामीला अनिश्चित काळासाठी भारतात राहण्याची कायदेशीर परवानगी मिळालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.