इराकमध्ये केरळच्या 46 नर्स फसल्यात

 इराकमधील तिकरित शहरात एका हॉस्पीटलमध्ये 46 भारतीय नर्सना दहशतवाद्यांनी बंद केले आहे. आयएसईएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक)ने एक बस बाहेर काढण्यासाठी पाठविली होती. मात्र, या बसमध्ये बसण्यास नकार दिलाय.

AP | Updated: Jul 3, 2014, 02:54 PM IST
इराकमध्ये केरळच्या 46 नर्स फसल्यात title=

नवी दिल्ली : इराकमधील तिकरित शहरात एका हॉस्पीटलमध्ये 46 भारतीय नर्सना दहशतवाद्यांनी बंद केले आहे. आयएसईएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक)ने एक बस बाहेर काढण्यासाठी पाठविली होती. मात्र, या बसमध्ये बसण्यास नकार दिलाय.

फसलेल्या 46 नर्स या हॉस्पीटलमधील एका खोलीत राहत आहेत. या नर्सच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीने सांगितले की, या सर्वजणी दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. त्यांना काहीही माहिती मिळत नाही. हे शहर दशहतवादी की सरकारच्या नियंत्रणाखाली आहे, याचीही माहिती नाही.

दरम्यान, फसलेल्या नर्सना डाळ-भात दिला जात आहे. त्यानंतर त्यांनी आपले जेवण तयार केले. त्यांना पाणीही दिले जात आहे. काही पत्रकारांनी सांगितले की, नर्स फोनही उचलत नाहीत. इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसैन यांच्या मूळ शहर असणाऱ्या या शहरावर कोणाचे नियंत्रण आहे, याची माहिती नाही. मात्र, या ठिकाणी सातत्याने बॉम्ब हल्ला होत आहे.

एक बॉम्ब नर्स राहत असलेल्या ठिणापासून 150 मीटर अंतरावर पडला. त्यानंतर नर्सना दुसऱ्या खोलीत हलविण्यात आले आहे. जनरेटरच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत आहे. तसेच एक डॉक्टरही हॉस्पीटलमध्ये आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.