श्रीनगर : एक भारतीय सैनिक बोटीतून पूर आलेल्या चिनाब नदीत वाहून गेला, ही नदी पाकिस्तानात जाते. भारताचा बीएसएफचा जवान सत्यशील यादव जेव्हा चिनाब नदीत वाहून गेला, त्यावेळी पाकिस्तान आर्मीला याविषयी सूचना देण्यात आली. या सैनिकाला पाकिस्तानी रेंजर्सने पाहिलं.
पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी सत्यशील यादवला सुरक्षित भारतात पाठवण्यावर राजी झाले आहेत. सत्यशील यादवला परत पाठवण्यावरून कोणताही वाद होणार नाही, फक्त काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील, असं पाकिस्तान आर्मीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
याआधी पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक मीडियात बातमी आली होती की, बीएसएफच्या एका जवानाला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. या जवानाने बजवाट क्षेत्रातील सियालकोट कुलैल गावात सीमा पार केली असा आरोप, पाकिस्तान आर्मीने केला होता. तसेच या जवानाला चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं आहे.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान 2013 मध्ये सीमेवर झालेल्या चकमकीनंतर संबंध खराब झाले होते. आता सत्यशील यादवच्या सुटकेवर सर्वांचं लक्ष लागून आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.