भारतीय वाईनला जगाचं `चीअर्स`

भारतीय वाईनला आता आंतरराष्ट्रीय व्हाईन आणि वाईन ऑर्गनायझेशनचा सदस्य होण्याचा मान मिळालाय. या सदस्यत्वामुळे तिला जागतिक मानांकन मिळणार आहे. या संस्थेच्या सदस्य असलेल्या पंचेचाळीस देशांमध्ये भारतीय वाईनला बाजारपेठ खुली होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 30, 2012, 12:30 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
भारतीय वाईनला आता आंतरराष्ट्रीय व्हाईन आणि वाईन ऑर्गनायझेशनचा सदस्य होण्याचा मान मिळालाय. या सदस्यत्वामुळे तिला जागतिक मानांकन मिळणार आहे. या संस्थेच्या सदस्य असलेल्या पंचेचाळीस देशांमध्ये भारतीय वाईनला बाजारपेठ खुली होणार आहे.
अमेरिकेतलं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वाईन अँन्ड व्हाईन म्हणजेच ओआयव्ही.. वाईनचं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ.. या संस्थेचे अध्यक्ष फेडेरीको कॅस्टेलुसी नुकतेच नाशिकमध्ये आले होते. वाईनच्या उत्पादनांत भारताची झेप आणि दशकपूर्तीनिमित्त त्यांनी विविध वाईनरींना भेट दिली आणि भारतातल्या वाईनची चवही चाखली. नाशिकच्या हवामानामुळे द्राक्षांची विशिष्ट अशी चव आहे त्यामुळे अशा द्राक्षांची वाईन जगभरात आकर्षण ठऱल्याचं कॅस्टेलुसी यांनी सांगितलं.
सध्या नाशिक जिल्ह्यात सदतीस पेक्षा जास्त वाईनरी आहेत. त्यामध्ये उच्च दर्जाच्या वाईन्स आणि शॅम्पेनचं उत्पादन घेतलं जातं. या वाईनरींमध्ये दरवर्षी पन्नास लाख लिटर वाईन तयार होते. त्यापैकी दहा टक्के वाईन जगभरातल्या पंचवीस देशांमध्ये तर साठ टक्के वाईन परराज्यात विकली जाते. या वाईनचा दर्जा उंचावल्यानं पॅरीसमध्ये होणा-या वाईन कॉन्फरन्समध्ये भारतीय वाईनची विशेष पार्टी देण्यात येणार आहे.

आता ओआयव्हीचं लेबल लागल्याने भारतीय वाईनसाठी आणखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. मात्र त्याचबरोबर केंद्र शासनानं निर्यातीच्या धोरणात शिथिलता, वन विंडो सिस्टिम आणि अनिर्बंध वाईन आयातीवर अंकुश आणणं गरजेचं आहे. तर भारतीय वाईन जगाच्या कानाकोप-यात पोहोचेल आणि पर्यायानं अर्थव्यवस्थाही बळकट होईल.