समुद्राच्या देवीची पूजा, 12 द्राक्षं खाणं अन्...; अशा हटके अंदाजात जगभरात केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत

Unusual New Year Traditions 2025 : नवीन वर्षाचं प्रत्येक देशात कसं स्वागत करतात... अनेक ठिकाणी हटके अंदाजात असं करतात स्वागत

दिक्षा पाटील | Updated: Dec 31, 2024, 11:17 AM IST
समुद्राच्या देवीची पूजा, 12 द्राक्षं खाणं अन्...; अशा हटके अंदाजात जगभरात केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत title=
(Photo Credit : Social Media)

Unusual New Year Traditions 2025 : संपूर्ण जगात नवीन वर्ष साजरी करण्यासाठी लोकं आनंदी आहेत. एकमेकांनना शुभेच्छा आणि जल्लोषापर्यंत राहिली नाही. जगात अनेक देश असे आहेत जिथे नवीन वर्ष हे हटके अंदाजात साजरी करतात. चेक गणराज्यमध्ये सफरचंद कापतात आणि त्यावरून ठरवतात की येणारं वर्ष हे कसं असणार आहे. तर लॅटिन अमेरिकेत 12 द्राक्ष खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करतात. अशा प्रकारे कोणत्या देशात कसं नवीन वर्षाचं स्वागत करतात ते जाणून घेऊया...

डेनमार्कमध्ये खुर्चीवर उडी मारून

डेनमार्कमध्ये 12 वाजले की लोकं लगेच खूर्चीवरून उडी मारून नवीन वर्षाचं स्वागत करतात. त्यांचं म्हणणं आहे की वर्षाच्या शेवटी तुम्ही जेवढ्या उड्या माराल तेवढं तुम्ही निगेटिव्ह एनर्जीपासून दूर रहाल आणि पॉझिटिव्ह एनर्जी राहिल.

चेक गणराज्य

चेक गणराज्यमध्ये नवीन वर्ष साजरी करण्यासाठी काही हटके परंपरा आहेत. इथे फळं कापून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची प्रथा आहे. नवीन वर्ष सुरु होणार त्याच्या आधी लोकं सफरचंदाचे दोन भाग करतात. जर सफरचंदात चांदण्यासारका आकार असेल तर येणारं वर्ष हे आनंदी जाणार. जर सफरचंद हे आतून क्रॉसच्या आकाराचं असेल तर तुमचे पुढचे 12 महिने हे कठीण जातील. 

किस करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

जर्मनीमध्ये नवीन वर्ष साजरा करण्याची एक हटके परंपरा आहे. इथे लोक मध्य रात्री एकमेकांना किस करुन नवीन वर्ष साजरी करतात. ही परंपरा चौथ्या शतकांपासून सूरू आहे. 

12 द्राक्ष खाण्याची परंपरा

लॅटिन अमेरिकेत स्पेन आणि इंडोनेशियामध्ये नवं वर्ष हे हटके अंदाजात साजरी करतात. नवीन वर्ष चांगलं जावं यासाठी इथे मध्यरात्र होण्या आधी रात्री द्राक्ष खातात. इथली परंपरा आहे की रात्री 12 च्या आधी 12 द्राक्ष खावी. त्यामुळे येणारं वर्ष हे खूप चांगलं जातं. 

स्कॉटलॅंडमध्ये न्यू ईयर साजरा करण्याची प्रथा 

स्कॉटलॅंडमध्ये न्यू ईयर साजरा करण्याची प्रथा खूप जुनी आहे. 8 व्या शतकापासून क्रिसमसवर बंदी घालण्यात आली होती आणि ‘होगमॅन’ अर्थात वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर लोकं एकमेकांना “लॅन्ग मे येर लुम रीक” असं म्हणतं शुभेच्छा देतात. त्याचा अर्थ तुम्ही चिमनीपेक्षा जास्त वेळ धूर काढत रहा. याचा अर्थ येणार वर्ष आनंदानं जाओ. 

ब्राझिल

ब्राझिलमध्ये नवी वर्षाचं काउंटडाउन काही दिवस आधीच सुरु होतं. सुंदर समुद्र किनाऱ्यावर फूल-हार आणि प्रसाद घेऊन पोहोचतात. लोकं समुद्रांच्या किनाऱ्यावर जाऊन साजरी करतात आणि समुद्राची देव येमोजाची पूजा करतात.