'इबोला' रोगामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

पश्चिम अफ्रिकन देशांमध्ये इबोला वायरसचा वाढ़ता धोका बघता जागतिक आरोग्य संघटनेने आता जागतिक आरोग्य आणीबाणी (आपत्ती) घोषित केली. पश्चिम अफ्रिकन राष्ट्रं इबोलामुळे आज पर्यंतंच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहेत. इबोला वायरसने पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये आतापर्यंत ९३२ लोकांचा बळी घेतला आहे. भारतातील सुमारे ४५ हजार नागरिक या देशांमध्ये राहत आहेत.

Updated: Aug 8, 2014, 05:40 PM IST
'इबोला' रोगामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित title=

जिनिव्हा : पश्चिम अफ्रिकन देशांमध्ये इबोला वायरसचा वाढ़ता धोका बघता जागतिक आरोग्य संघटनेने आता जागतिक आरोग्य आणीबाणी (आपत्ती) घोषित केली. पश्चिम अफ्रिकन राष्ट्रं इबोलामुळे आज पर्यंतंच्या सगळ्यात वाईट काळातून जात आहेत. इबोला वायरसने पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये आतापर्यंत ९३२ लोकांचा बळी घेतला आहे. भारतातील सुमारे ४५ हजार नागरिक या देशांमध्ये राहत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. मार्गारेट चान यांनी सांगितले की प्रथम इबोलाची लागणं गिनी या देशात झाली. त्यानंतर तो सिएरा आणि लिबेरीयात पोहचला. इबोलाची लागण झालेल्या देशात त्यांना या रोगावर नियंत्रण मिळवता येत नसल्यामुळे इबोलाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने जगातल्या प्रत्येकाने एकत्र येऊन मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अतिसार ताप, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या हे या वायरसची लक्षणे आहेत. या वायरसमुळे यकृत आणि मूत्रपिंड काम करणं कमी करतात. काही लोकांमध्ये रक्तस्त्राव सुरू होण्याची समस्या देखील सुरू होते. यावर लस किंवा विशिष्ट उपचार अजूनतरी अस्तितवात नाही. याचा मृत्यू दर कमीत कमी 60 टक्के आहे.

हा वायरस विशेषत: आजारी प्राण्यांच्या रक्तात किंवा शरीरातील द्रव्य पदार्थामुळे पसरतो. हा संसर्गजन्य आजार असून दूषित पर्यावरणामुळे याचा प्रसार होतो. याआधी २००९मध्ये स्वाईन फ्ल्यू आणि त्याही आधी पोलिओमुळे चांगलीच दहशत पसरली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.