आंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा

अमेरीकेतील विमान उत्पादन कंपनी बोईंग भारताला सहा एअरक्राफ्ट पुरविणार आहे. पी -८ आय प्रकारातील हे एकरक्राफ्ट असतील. नौदलासाठी त्याचा उपयोग होणार आहे. २००९ मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार बोईंग भारताला सेवा देणार आहे.

Reuters | Updated: Nov 26, 2014, 07:03 PM IST
आंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा  title=

वॉशिंग्टन : अमेरीकेतील विमान उत्पादन कंपनी बोईंग भारताला सहा एअरक्राफ्ट पुरविणार आहे. पी -८ आय प्रकारातील हे एकरक्राफ्ट असतील. नौदलासाठी त्याचा उपयोग होणार आहे. २००९ मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार बोईंग भारताला सेवा देणार आहे.

अवैध शस्त्रसाठा जप्त
अमेरीकेतील लुईस भागात दोन गटात उसळलेल्या दंगलीतील आरोपींवर पोलिसांकडून कारवाई केली जातेय. अनेक ठिकाणी छापे टाकून अवैध शस्त्रसाठा जप्त केला जातोय. अध्यक्ष बराक ओबामा यांनीही हिंसा करणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिलाय.

ब्राझीलमध्ये २६/११
ब्राझीलमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालीये. साओ पाऊलो शहरालाही फटका बसलाय. वाहतूक विस्कळीत झालीये. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात. प्रशासनानं पुरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु केलंय. 

हवाई बंदी
सिरीयातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लष्करानं आठ ठिकाणी हवाई बंदी केलीये. सिरीयाच्या सिमेवरील राका आणि कोबानी शहरात मोठा तणाव आहे. अमेरिकाही सिरीयातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे.

भूकंपाचा धक्का
चिनच्या दक्षिण-पश्चिम भागाला भूकंपाचा धक्का बसलाय. ५.८ रिश्टर स्केलचा हा धक्का होता. अनेक ठिकाणी लोक घाबरुन घराबाहेर निघाले. कुठलीही जीवीतहानी झाली नसल्याचं प्रशासनानं म्हटलंय. 

मिस वर्ल्ड स्पर्धा
लंडनच्या मारीओट हॉटेलमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेच आयोजन करण्यात आलंय. १४ डिसेंबरला अंतिम सोहळा रंगणार आहे. १२५ स्पर्धक आपआपल्या देशांचं प्रतिनिधीत्व करतायेत.  मागील वर्षीची विश्वसुंदरी मेगान यंग फिलिपाईन्सचं प्रतिनिधीत्व करतेय.

ट्रकचा हा थरारक व्हिडिओ...
एक अवजड ट्रेलर ट्रक आणि फॉर्म्युला वन कार मोकळ्या रस्त्यावरून धावतेय... फुल स्पीडमध्ये... आणि रस्त्यात मध्येच ट्रकच्या खाली एक रॅम्प म्हणजे उंचवटा आला तर...? तर एक वर्ल्ड रेकॉर्ड बनू शकतो... ट्रकच्या सर्वात लांब उडीचा... 83 फूट आणि 7 इंच उडी घेणा-या ट्रकचा हा थरारक व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.