इराकमधील भारतीयांसाठी भारताची लष्करी तयारी सुरू

इराकमधली सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारनं आपली लष्करी तयारी सुरू केलीय. आयएनएस म्हैसूर आणि आयएनएस तर्कष या दोन युद्धनौका पर्शियन गल्फमध्ये तैनात केल्या आहेत.

PTI | Updated: Jun 29, 2014, 02:50 PM IST
इराकमधील भारतीयांसाठी भारताची लष्करी तयारी सुरू title=

नवी दिल्ली: इराकमधली सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारनं आपली लष्करी तयारी सुरू केलीय. आयएनएस म्हैसूर आणि आयएनएस तर्कष या दोन युद्धनौका पर्शियन गल्फमध्ये तैनात केल्या आहेत.

इसिस या दहशतवादी संघटनेनं इराकच्या काही शहरांवर ताबा मिळवलाय. त्यामुळं इराकी सैन्य आणि इसिस यांच्यात इराकमध्ये संघर्ष सुरू आहे. इराकमध्ये जवळपास १० हजार भारतीय नागरिक विविध ठिकाणी आहेत. त्यातले मोसूलमधले जवळपास ४० भारतीयांचं अपहरण झालंय. मात्र सर्वच इराकमध्ये भारतीय संकटात आहेत असंही नाही. या परिस्थितीवर नजर ठेऊन असलेल्या भारत सरकारनं आता आपल्या आयएनएस म्हैसूर आणि आयएनएस तर्कश या दोन युद्धनौका पर्शियन गल्फमध्ये तैनात केल्या आहेत.

गरज पडल्यास या युद्धनौका भारतीय नागरिकांना इराकच्या बाहेर काढण्याचंही काम करणार आहेत. दरम्यान अपहरण झालेल्या भारतीयांना कोणतीही इजा पोहोचलेली नाही अशी खात्रीलायक माहिती असल्याचं परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय

दरम्यान, नेव्हीसोबतच एअरफोर्सनंही आपली तयारी ठेवलीय. नागरिकांना इराकमधून बाहेर काढण्यासाठी गरज लागल्यास इंडियन एअर फोर्स सी-१७ आणि सी-१३० जे हर्क्युलिस ही दोन विमानं तैनात करू शकतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.