इराकमध्ये ISISच्या विरोधात उतरली 'फीमेल आर्मी'!

ISIS इराकचा दुश्मन. पण आता इराकच्या सुखशांतीची धुळधाण करणाऱ्या दुश्मनांचा खातमा होणार आहे. इराकी सेनेबरोबरच आता कुर्दीस फिमेल आर्मीनं ISISच्या दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटले आहेत. इराकमध्ये महिलांनी दुर्गा अवतार धारण केलाय..

Updated: Aug 23, 2014, 01:24 PM IST
इराकमध्ये ISISच्या विरोधात उतरली 'फीमेल आर्मी'!   title=

मुंबई: ISIS इराकचा दुश्मन. पण आता इराकच्या सुखशांतीची धुळधाण करणाऱ्या दुश्मनांचा खातमा होणार आहे. इराकी सेनेबरोबरच आता कुर्दीस फिमेल आर्मीनं ISISच्या दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटले आहेत. इराकमध्ये महिलांनी दुर्गा अवतार धारण केलाय..

उत्तरी इराकमधून दहशतवाद्यांना उखडून फेकण्यासाठी फीमेल आर्मीच्या शेकडो रणरागिणींनी कंबर कसून मैदानात उडी घेतलीय. महिला आर्मीतल्या बहुतेक फीमेल फायटर्स तुर्कीस कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या आहेत. आता ISISच्या दहशतवादाला संपवण्यासाठी त्या इराकच्या सीमेवर तैनात झाल्यात.
 

आता ISISच्या दहशतवाद्यांना दुहेरी आक्रमणाला तोंड द्यावं लागणार आहे. सिंजरचे पहाड आणि एरबिलच्या आकाशातून अमेरिका सैनिक हल्ले करताहेत. तर जमीनीवर असॉल्ट रायफल्स, आधुनिक हत्यारे आणि आर्मी ट्रेनिंगसह फीमेल गुरिल्ला फायटर्स सज्ज झाल्यात. आता आहे एकच लक्ष्य... ISIS चा खातमा....

गेल्या दोन आठवडयांपासून अमेरिकेनं इराकमधील ISISच्या तळांवर जोरदार हल्ले चढवलेत. त्यामुळं ISISला हादरा बसलाय. ISISनं इराकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 3000 पेक्षा जास्त महिलांना बंदी बनवण्यात आलंय. गेल्या दोन आठवडयातच ISISनं एक हजारपेक्षा जास्त महिलांचं अपहरण करत त्यांच्यावर अत्याचार सुरु केलेत. इस्लामचा स्वीकार केला नाही तर महिलांना गोळ्याही घालण्यात येताहेत.

पण आता ISISचा खातमा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत रणरागिणी. त्यामुळं आता ISISच्या दहशतवाद्यांनाही धडकी भरलीय.

फीमेल आर्मीच्या महिलांनी ISISच्या दहशतवाद्यांना थेट आव्हान दिलंय. दहशतवाद्यांच्या मनात धडकी भरवण्यात त्या यशस्वी झाल्यात. जिहादची लढाई लढणाऱ्यांना भीती आहे की, जर महिलांच्या हातून मृत्यू आला तर जन्नतही नसीब होणार नाही.

कुर्द फिमेल आर्मीला इराकच्या सर्वसामान्य महिलांचीही साथ मिळतेय. इराकच्या भूमिवरुन दहशतवाद्यांना उखडून फेकण्यासाठी आता सर्वमामान्य महिलाही पुढे सरसावल्यात. हातात पिस्तुल घेऊन ISISच्या विरोधात नारेबाजी करणाऱ्या ह्या महिला म्हणजे इराकची दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटका होण्याचा दिवस जवळ आलाय याचाच प्रत्यय देत आहेत. कारण आता इराकमध्ये महिलांनी दुर्गा अवतार धारण केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.