वॉशिंग्टन : अमेरिकी लष्कराचे सेंट्रल कमांडचे ट्विटर आणि यू-ट्यूब पेज हॅक करण्यात आले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थक असलेल्या एका समुहाकडून ट्विटर पेज हॅक करण्याता आलं, त्यानंतर अमेरिकी लष्कराकडून बंद करण्यात आले आहे.
'सायबर खिलापत' असे या गटाचं नाव आहे, हॅकिंगनंतर एक ट्विट करून त्यांनी म्हटलंय, 'अमेरिकन सोल्जर्स, वुई आर कमिंग, वॉच युअर बॅक'.
ट्विटर पेजवरील बॅनर हटवून त्यावर 'लव्ह यू इसिस' असे लिहिण्यात आलंय, पेज हॅक झाल्यानंतर अमेरिकेने हे पेज बंद केलंय.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा इंटरनेट कंपन्यांना सायबर हल्ल्यांपासून रोखण्यासाठी नवे प्रस्ताव देण्याच्या तयारीत आहेत, अशावेळी हे पेज हॅक करण्यात आलंय, त्यामुळे अमेरिकेच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी चिंतेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.