पॅरिस : मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्याने फ्रान्समधील 'शार्ली हेब्डो'च्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला करून १२ जणांना ठार केले. या घटनेतून सावर 'शार्ली हेब्डो'ने आपल्या अंकात पुन्हा मोहम्मद पैगंबरांचे व्यगचित्र प्रकाशित केलेय.
पॅरिसमधील 'शार्ली हेब्डो'वर गेल्या आठवड्यामध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात १० पत्रकार आणि दोन पोलीस ठार झाले होते. यानंतर फ्रान्ससहित जगभरामधून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर दोन दहशतवादी एका गोदामात लपले होते. दोन दिवसांनी त्यांचा खातमा करण्यात पोलिसांना यश आले.
'शार्ली हेब्डो'ने पुन्हा एकदा नव्याने अंकाची तयारी सुरु केली असून, हा खास अंक अनेक भाषांमधून प्रकाशित केला जाणार आहे. या नव्या अंकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर पैगंबरांना 'मी शार्ली' अशा आशयाचे शब्द असलेली पाटी हातामध्ये घेऊन उभे दाखविण्यात आले आहे.
या अंकास 'सर्व काही माफ आहे (ऑल इज फरगिव्हन)' असा मथळा देण्यात आला आहे. प्रेषित मोहम्मद हे त्यांचे व्यंगचित्र काढल्याबद्दल व्यंगचित्रकारांना माफ करत असल्याचा संदेश, यामधून देण्यात असल्याचा अर्थ फ्रेंच माध्यमांमध्ये यासंदर्भात काढण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.