बेरुत : आयएसआयएस दहशतवाद्यांची केलेला छळाची अंगावर काटे आणणारी कहाणी ज्यू महिलांनी सांगितली. दहशतवाद्यांनी त्यांना घरातून कि़डनॅप केलं होतं, आणि अनेक दिवस सेक्ससाठी त्यांचं शोषण करण्यात आलं.
सध्या दोन मुली इराकच्या रिफ्यूजी कँम्पमध्ये राहत आहेत, त्यांनी ब्रिटनची न्यूज वेबसाईट मेल ऑनलाईनला आपली कहाणी ऐकवली.
गुलामासारखं बंदिस्त ठेवलेल्या १९ वर्षाच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिला खरेदी करणारा पहिला व्यक्ती तिच्यावर रेप करत होता. तिने नकार दिल्यास त्याच्या एका वर्षाच्या मुलाला तो अतिशय वाईट पद्धतीने मारत होता. तिच्या मुलाचा विचार करून तिने आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला होता.
मॉर्फिन देऊन सेक्स केला
एका २५ वर्षाच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार मॉर्फिन देऊन त्यांच्या सोबत सेक्स केला जात होता, कारण त्यांनी गुपचूप अंथरूणावर पडू नये आणि रडू नये, एका दहशतवाद्याने तर तिला एवढं मारलं की दोन महिन्यांपर्यंत ती स्व:तच्या पायावर उभी राहू शकली नाही. आयएसआयएसने मागील वर्षाच्या सात ऑगस्टपासून २०० ज्यू मुलींचं अपहरण केलं आहे.
सर्वात सुंदर मुलींचा लिलाव करण्यासाठी त्यांना स्लेव मार्केटमध्ये पाठवलं जात होतं, तिथे कपडे उतरवून त्यांना भरमसाठ पैशांच्या बदल्यात विकलं जात होतं.
१९ वर्षांच्या रिहानची कहाणी
१९ वर्षाची रिहान, ओळख लपवण्यासाठी खरं नाव बदलण्यात आलं आहे. रिहान आपल्या पती आणि मुला सोबत राहत होती तेव्हा ३० गाड्यांनी दहशतवादी आले, तिला आणि तिच्या पतीला ५० किलोमीटर दूर नेण्यात आलं, त्यानंतर तिच्या पतीला वेगळं करण्यात आलं, त्यानंतर रिहानला ५० वर्षाच्या अतिरेक्याला विकण्यात आलं, एका शाळेत २०० मुलींसोबत तिचा देखिल नंतर लिलाव झाला, एक दहशतवादी तिला विकत घेऊन घरी गेला, तिला १० महिन्यांपर्यंत बंदिस्त ठेवण्यात आलं.
मुलासाठी ती जगली
मी माझ्या मुलासाठी त्याला सर्व काही करू दिलं, जे त्याला आवडेल ते मी करण्याची भूभा दिली. यानंतर रिहानला मोसूलच्या एका दहशतवाद्याला विकण्यात आलं., त्याने नंतर तिला इस्लामिक स्टेटच्या लिबियाच्या दहशतवाद्याला तिने विकलं. रहान तेथे एका २२ वर्षाच्या मुलीसोबत राहत होती, तिची ५ वर्षांची मुलगी होती, दहशतवाद्याने तिच्या आईसमोर ५ वर्षाच्या मुलीवरही बलात्कार केला.
अखेर रिहानवर एका दहशतवाद्याला दया आली, त्या दहशतवाद्याच्या मदतीने रिहानने बुरखा घालून तेथून सुटका करून घेतली, ती आता तिच्या आई आणि मुलासोबत राहते, तिचा पती, वडिल आणि दोन बहिणींचा अजूनही काही तपास लागलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.