'सिगारेटच्या पाकिटाच्या किंमतीत इसिसमध्ये विकल्या जातात मुली'

इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचे दहशतवादी अपहकरण करण्यात आलेल्या मुलींना अवघ्या एका सिगारेटच्या पाकिटाच्या किेंमतीत विकतात, अशी माहिती लैंगिक हिंसेसंबंधी प्रकरणांशी निगडीत संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीनं ही माहिती दिलीय. 

Updated: Jun 9, 2015, 01:49 PM IST
'सिगारेटच्या पाकिटाच्या किंमतीत इसिसमध्ये विकल्या जातात मुली' title=
फाईल फोटो

संयुक्त राष्ट्र : इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचे दहशतवादी अपहकरण करण्यात आलेल्या मुलींना अवघ्या एका सिगारेटच्या पाकिटाच्या किेंमतीत विकतात, अशी माहिती लैंगिक हिंसेसंबंधी प्रकरणांशी निगडीत संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीनं ही माहिती दिलीय. 

संयुक्त राष्ट्राचा दूत जैनब बांगुरा यानं दिलेल्या माहितीनुसार, ही एक अशी लढाई आहे जी महिलांच्या शरीरावर लढली जातेय. बांगुरा यांनी एप्रिलमध्ये इराक आणि सीरियाचा दौरा केलाय. त्यानंतर ते इसिसच्या दहशतवाद्यांच्या लैंगिक छळवणुकीशी लढण्यासाठी योजना बनवण्यावर काम करत आहेत. 

संयुक्त राष्ट्राच्या या दूतानं इसिसच्या दहशतीखाली असलेल्या भागांत दहशतवाद्यांच्या तावडीतून निसटून आलेल्या महिला आणि मुलींची भेट घेतली. स्थानिक धार्मिक नेत्यांशी आणि राजकारण्यांशी चर्चा केली. तसंच त्यांनी तुर्की, लेबनान आणि जॉर्डनमध्ये शरणार्थींचीही भेट घेतली. 

तरुणांना आकर्षित करण्यासाठी मुलींच्या शरीराचा वापर... 
इसिसचे दहशतवादी जेव्हा एखाद्या भागावर कब्जा करतात तेव्हा पहिल्यांदा ते महिलांचं अपहरण करतात. या मुलींना सिगारेटच्या एका पाकिटाच्या किंमतीत किंवा काही हजार डॉलर्समध्ये विकलं जातं. जैनब यांनी अनेक तरुणींच्या करूण व्यथा सांगितल्यात. यापैंकी अनेक जणी अल्पसंख्यांक समुदायाशी निगडीत आहेत. हाच समुदाय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे.

काही जणींचं अपहरण करून त्यांना एका अंधाऱ्या कोठडीत बंद करण्यात आलं होतं. एका छोट्या घरामध्ये १०० हून अधिक मुलींना ठेवण्यात आलं होतं. त्यांना निर्वस्त्र करून आंघोळ घालण्यात आली. त्यांनंतर त्यांना पुरुषांच्या एका समुहासमोर उभं करण्यात आलं आणि त्यानंतर मुलींचा लिलाव करण्यात आला.

मुलींचं अपहरण करणं... आणि मुलींच्या शरीराची लालूच दाखवून परदेशी तरुणांना संघटनेत सहभागी करणं हा इसिसची रणनितीचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या १८ महिन्यांत इराक आणि सीरियामध्ये अनेक परदेशी तरुण संघटनेत सहभागी झालेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.