न्यू यॉर्क : उल्का पडून संपूर्ण जग नष्ट होणार असल्याचं भाकित षडयंत्रकारी थेरोरिस्ट यांनी व्यक्त केले आहे. त्यांननी केवळ भाकीत व्यक्त केले नाही तर उल्का पृथ्वीला धडकण्याची तारीखही सांगितले आहे. त्यांच्यामते या वर्षी २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत उल्का पिंड पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. मात्र, नासाने हा दावा फेटाळला आहे.
मिरर या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हा सिद्धांत मांडणाऱ्या व्यक्तींनी गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत इंटरनेटच्या माध्यमातून विविध ब्लॉग आणि वेबसाइटच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली आहे. उल्का पृथ्वीला धडकल्यानंतर संपूर्ण नष्ट झाल्यावर सर्व सामान्य होण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागणार आहे.
या सिद्धांत मांडणाऱ्यांच्या मते या सर्वनाशानंतर नवीन जग निर्माण होणार आहे. त्यानंतर तेच जगाचा ताबा घेईल आणि जग चालवतील. जगातील सर्व राजकारण्यांना अशा प्रकारे उल्का पिंड धडकणार असल्याचे माहित आहे, पण त्यांनी जनतेला ही बाब न सांगण्याचे ठरवले असल्याचाही दावा या षडयंत्रकारी सिद्धांतकर्त्यांनी केला आहे.
नासाकडून दावा फेटाळला
उल्का पडून जग नष्ट होणार असल्याच्या दाव्याला नासाच्या संशोधकांनी फेटाळलं आहे. या संदर्भात नासाच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, अशा प्रकारे कोणतीही उल्का पडणार नाही. नासाला माहित आहे की कोणतीही उल्का किंवा धूमकेतू पृथ्वीला धडकण्याच्या स्थितीत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे मोठी टक्कर होण्याची शक्यता फारच कमी आहे, असल्याचे नासाकडून स्पष्ट करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.