इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात

इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात झाला असून २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. दोन प्रवासी ट्रेनने एकमेकांना समोरुन धडक दिली. कोरॅटो आणि अँड्रिया शहरांच्या मध्यभागी हा अपघात झाला . 

Updated: Jul 12, 2016, 09:50 PM IST
इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात title=

रोम : इटलीमध्ये भीषण ट्रेन अपघात झाला असून २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. दोन प्रवासी ट्रेनने एकमेकांना समोरुन धडक दिली. कोरॅटो आणि अँड्रिया शहरांच्या मध्यभागी हा अपघात झाला . 

अपघात इतका भीषण होता की ट्रेनचा चेंदामेंदा झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्याला सुरुवात केली आहे. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.